भारतीय फलंदाजी ढेपाळली

0
108

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या व शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव १८७ धावांत संपुष्टात आला. द. आफ्रिकेने दिवसअखेर १ बाद ६ अशी मजल मारली आहे. दौर्‍यात प्रथमच नाणेफेक जिंकल्यानंतर विराटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाजांसाठीचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणार्‍या न्यू वॉंडरर्सच्या या मैदानावर पहिल्या डावात भारताकडून विराट कोहली (५४), चेतेश्‍वर पुजारा (५०) व भुवनेश्‍वर कुमार (३०) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या रचता आली. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने तीन, व्हर्नोन फिलेंडर, मॉर्ने मॉर्कल व फेलुकवायो यांनी प्रत्येकी २ तर लुंगी एनगिडीने १ गडी बाद केला. धावांचा पाठलाग करताना भुवनेश्‍वर कुमारने ऐडन मारक्रम (२) याला बाद करत पाहुण्यांना एक धक्का दिला. भारताने या सामन्यासाठी संघात दोन बदल करताना रोहित शर्मा व रविचंद्रन अश्‍विन यांना वगळून अजिंक्य रहाणे व भुवनेश्‍वर कुमार यांना संधी दिली. दुसरीकडे द. आफ्रिकेने फिरकीपटू केशव महाराज याला बाहेरचा रस्ता दाखवून मध्यमगती गोलंदाजी करणारा उपयुक्त फलंदाज आंदिले फेलुकवायोला अंतिम ११मध्ये स्थान दिले.

धावफलक
भारत पहिला डाव ः मुरली विजय झे. डी कॉक गो. रबाडा ८, लोकेश राहुल झे. डी कॉक गो. फिलेंडर ०, चेतेश्‍वर पुजारा झे. डी कॉक गो. फेलुकवायो ५० (१७९ चेंडू, ८ चौकार), विराट कोहली झे. डीव्हिलियर्स गो. एनगिडी ५४ (१०६ चेंडू, ९ चौकार), अजिंक्य रहाणे पायचीत गो. मॉर्कल ९, पार्थिव पटेल झे. डी कॉक गो. मॉर्कल २, हार्दिक पंड्या झे. डी कॉक गो. फेलुकवायो ०, भुवनेश्‍वर कुमार झे. फेलुकवायो गो. रबाडा ३०, मोहम्मद शामी झे. रबाडा गो. फिलेंडर ८, इशांत शर्मा झे. ड्युप्लेसी गो. रबाडा ०, जसप्रीत बुमराह नाबाद ०, अवांतर २६, एकूण ७७ षटकांत सर्वबाद १८७
गोलंदाजी ः मॉर्ने मॉर्कल १७-५-४७-२, व्हर्नोन फिलेंडर १९-१०-३१-२, कगिसो रबाडा १९-७-३९-३, लुंगी एनगिडी १५-७-२७-१, आंदिले फेलुकवायो ७-१-२५-२
द. आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार नाबाद ४, ऐडन मारक्रम झे. पटेल गो. भुवनेश्‍वर २, कगिसो रबाडा नाबाद ०, अवांतर ०, एकूण ६ षटकांत १ बाद ६
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ३-२-३-१, जसप्रीत बुमराह ३-२-३-०