भाभासुमंच्या मातृभाषा रक्षक नोंदणीस प्रारंभ

0
100

>> ३८ मतदारसंघातील ६८८ जणांनी केले ‘कंकण’ परिधान

भारतीय भाषा सुरक्षा मंचने काल कुजिरा-बांबोळी येथील हेडगेवार हायस्कूलात आपल्या मातृभाषा रक्षक नोंदणी अभियानचा शुभारंभ करताना ६८८ जणांची मातृभाषा रक्षक म्हणून नोंदणी केली. मनगटाला मातृभाषा रक्षक कंकण परिधान करून ही नोंदणी करण्यात आली. ३८ मतदारसंघांतून मातृभाषा रक्षक बनण्यासाठी भाभासुमंचे प्रमुख कार्यकर्ते बैठकीस आले होते.

मातृभाषा रक्षक नोंदणीसाठी आयोजित या कार्यक्रमात भाभासुमंचचा पुढील तपशीलवार कृती कार्यक्रम ठरवण्यात आला.
१०० ठिकाणी निदर्शने तसेच जाहीर सभा व बहिष्कार तसेच मातृभाषा रक्षक नोंदणी कार्यक्रम मिळून एकूण ५२० कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधीची तपशीलवार माहिती अवधूत कामत यांनी यावेळी दिली. यावेळी आनंद शिरोडकर यांनी मातृभाषा रक्षक नोंदणी अभियानाविषयी सादरीकरण केले.
नंतर मातृभाषा रक्षकांचा प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मातृभाषा रक्षक नोंदणी मोहिमेचा ऍड. उदय भेंब्रे यांच्याहस्ते शुभारंभ झाला. भेंब्रे यांनी यावेळी मातृभाषा रक्षण नोंदणी अभियान विषयी सविस्तर माहिती दिली.
सर्वप्रथम सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक केले. तद्नंतर सुभाष वेलिंगकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.