Home Featured भाजप अध्यक्ष नितीन नबीनउद्यापासून गोवा दौऱ्यावर

भाजप अध्यक्ष नितीन नबीनउद्यापासून गोवा दौऱ्यावर

0

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवार 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता गोव्यात आगमन होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे भाजपचे आमदार, गाभा समिती, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली.

भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नबीन सध्या विविध राज्यांना भेट देत आहेत. येत्या 30 व 31 जानेवारीला गोव्यात येणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे. मोप विमानतळावर नितीन नबीन यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवारी 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ताळगाव येथील सामाजिक सभागृहात भाजप मतदान केंद्र कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष नवीन मार्गदर्शन करणार आहेत, असेही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
राज्यात सध्या गाजत असलेल्या युनिटी मॉल प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत योग्य निर्णय घेतील, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. यावेळी भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर, सर्वानंद भगत यांची उपस्थिती होती.