भाजपने मुस्लीम बांधवांसाठी दोन जागा द्याव्यात : शेख जीना

0
27

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लीम बांधवांना किमान दोन जागा द्याव्यात अशी मागणी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी व अखिल भारतीय हज समितीचे अध्यक्ष शेख जीना यांनी केली आहे.

दक्षिण गोव्यातील नावेली मतदारसंघात ८ हजार मुस्लीम मतदार आहेत. ह्या मतदारसंघात मुस्लीम मतदाराला भाजपने उमेदवारी द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. काल पत्रकार परिषदेत बोलताना जीना यांनी वरील मागणी केली. भाजपने यापूर्वी या मतदारसंघातून आपणाला उमेदवारी दिली असल्याचेही जीना यांनी यावेळी बोलताना सांगितले.

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने मुस्लीम बांधवांना किमान दोन मतदारसंघात उमेदवारी द्यावी. तसेच सर्व सरकारी योजनांचा मुस्लिमांना लाभ मिळेल याकडे लक्ष देतानाच नोकरभरती करतानाही त्यांचा विचार केला जावा, अशी सूचनाही जीना यांनी केली आहे.