कंत्राटी शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांचा पगारवाढीचा प्रस्ताव फेटाळला

0
134

>> सेवेत कायम करण्याच्या मागणीवर ठाम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार्‍या कंत्राटी शिक्षक यांच्यातील चर्चेची पहिली फेरी फिसकटली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वाढीव पगार व इतर सुविधांबाबत प्रस्ताव ठेवला. तथापि धरणे आंदोलन करणार्‍या शिक्षकांनी हा प्रस्ताव फेटाळला.

येथील आझाद मैदानावर मागील चार दिवसांपासून हे कंत्राटी शिक्षक धरणे आंदोलन करीत आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाला शुक्रवारी चर्चेसाठी बोलाविले होते. या शिक्षकांचा पगार १५-१६ हजारावरून २५ हजार करणे, तसेच शिक्षकांना जेवण व वाहतूक खर्च , पगारात वार्षिक वाढ, दरवर्षी कराराचे नूतनीकरण देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र आंदोलक शिक्षकांनी या सर्व मागण्या फेटाळून लावल्या. आंदोलन करणार्‍या शिक्षकांनी सेवेत कायम करण्याची आपली मागणी लावून धरली. त्यामुळे सरकारतर्फे ही चर्चा अर्ध्यावर बंद करावी लागली.

धरणे आंदोलन करणार्‍या शिक्षकांनी सामजस्यांची भूमिका घ्यावी. विषय जास्त ताणून धरू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.