भाजपचा पराभव करण्याचा निर्धार : प्रा. वेलिंगकर

0
99

संघ ही विचारधारा आहे. संघाचे क ाम कुणाच्या आदेशावरून चालत नसते. समाजावर जेव्हा संकट येते त्यावेळी ते दूर करण्यासाठी धाव घेण्याचे काम संघ करीत आला आहे. इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे अनुदान रद्द करणे व कोकणी-मराठी या देशी भाषांतूनच प्राथमिक शिक्षण व्हावे यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचने घेतलेल्या प्रत्येक निर्णयास गोवा प्रांताचा अखेरपर्यंत पाठिंबा असेल असे, गोवा प्रांत प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचा निर्णयही त्यांनी व्यक्त केला. संघाचे राज्यात १० हजार सक्रीय कार्यकर्ते आहेत तर एकूण ३ लाख स्वयंसेवक आहेत. त्या सर्वांना एकत्र आणून येत्या विधानसभा निवडणुकीत मातृभाषेशी गद्दारी करणार्‍या व जनतेची फसवणूक करणार्‍या भाजपचा पराभव करण्याचा निर्धार प्रा. वेलिंगकर यांनी व्यक्त केला.

भाजपने संघाला गृहीत धरू नये
संघाचा जन्म भाजपात झालेला नसून भाजप नेत्याचा जन्म संघाच्या घरात झालेला आहे. त्यामुळे भाजपने संघाला गृहीत धरू नये, असे आवाहन वेलिंगकर यांनी केले.
आता आपण मुक्त
भाजपचा पराभव करण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे राजकीय विभाग प्रमुख ऍड्. उदय भेंब्रे यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती व त्या निर्णयाशी आपण बांधील असल्याचे त्यांनी सांगितले. आता आपण मुक्त झालो असून समाजाच्या हितासाठी कोणताही निर्णय घेण्यास संघाचा कार्यकर्ता म्हणून आपण स्वतंत्र आहोत. संघाची स्थापना समाजाच्या भल्यासाठीच झाली होती. गोळवणकर गुरुजी, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यासह सर्व संघचालकांचा आदर्श आपल्यासमोर आहे, असे वेलिंगकर म्हणाले.
राजस्थान येथे संघाच्या अधिवेशनातील प्रतिनिधी सभेत मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणाच्या सिधांतावर शिक्कामोर्तब केले होते व तेच काम आपण करीत असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले