भाजपचा तूर्त स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय

0
52

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील आघाडीबाबत एवढ्या लवकर निर्णय घेतला जाऊ शकत नाही. भाजपने तूर्त आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यात भाजप आणि मगोप यांच्यात निवडणूक आघाडी होण्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना तानावडे म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या आघाडीबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेतला जाऊ शकतो. तूर्त भाजपने ‘एकला चलो रे’चा निर्णय घेतला आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
सहकार मंत्री गोविंद गावडे यांच्या भाजप प्रवेशाबाबत आत्ताच निर्णय घेतला जाऊ शकत नाही. गावडे हे अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या काही सांगू शकत नाही. गावडे यांनी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांशी भाजप प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.