बुधवारी कोरोनाने एकही मृत्यू नाही

0
161

राज्यात काल बुधवारी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. सध्या कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या ७६८ एवढी आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले काल ६३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ५३,६३८ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ७६१ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९९.१४ टक्के झाले आहे. तसेच काल राज्यात ७० जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५२,१०९ एवढी झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
काल खात्यातर्फे १७७४ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.

कोरोना संसर्ग झालेल्या १५,२५५ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २८,४८१ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ४,५६,१३० एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक ९९ रुग्ण असून फोंड्यात६७ रुग्णसंख्या आहे. पणजीत ७२ तर पर्वरीत ४६ जण उपचार घेत आहेत.
काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ४८ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर ३५ जण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.