म्हादईप्रश्‍नी आपची आल्तिनोत निदर्शने

0
180

आम आदमी पक्षाच्या (आप) एका शिष्टमंडळाने म्हादईप्रश्‍नी आल्तिनो पणजी येथे काल मुख्यमंत्र्याच्या सरकारी निवासस्थानाबाहेर निदर्शने करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एक निवेदन सादर केले.
राज्यात म्हादई या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून करण्यात येणार्‍या आरोप प्रत्यारोपामुळे म्हादईचा प्रश्‍न पुन्हा एकदा गाजत आहे. म्हादईप्रश्‍नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले.

म्हादईप्रश्‍नी नवी दिल्ली येथे नेण्यात येणार्‍या सर्वपक्षीय शिष्टमंडळात आपच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. म्हादई नदी वाचविण्यासाठी कडक भूमिका घ्यावी. कुणाच्याही कसल्याच प्रकारच्या दबावाला बळी पडू नये, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती आपचे राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केला.