उत्पल पर्रीकर राष्ट्रीय औद्योगिक मंडळात

0
210

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम औद्योगिक मंडळाचे सदस्य म्हणून उत्पल पर्रीकर यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. या मंडळात एकूण ४६ सदस्य आहेत. यात विविध राज्यांचे मंत्री, सचिव, बँकांच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम औद्योगिक मंडळ हे कलम २००६ च्या उपकलम ३ अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री प्रतापचंद्र शडगी हे या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. या मंडळात समावेश झालेले उत्पल पर्रीकर हे गोव्यातील एकमेव सदस्य आहेत.