फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा गोव्यात होण्याची दाट शक्यता आहे. 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सदर स्पर्धा होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली व गोवा या दोन ठिकाणांचा गांभीर्याने विचार सुरू होता. गोव्याने यात बाजी मारल्याचे मानले जात आहे. सीनियर दिल्ली चेस असोसिएशन किंवा गोवा बुद्धिबळ संघटनेने अजून याला दुजोरा दिलेला नाही. जगभरातून सुमारे 200 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ किंवा फिडेनेदेखील याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. 2002 साली हैदराबादने या स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. त्यावेळेस विश्वनाथन आनंद विजयी झाला होता.