Home Featured बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारयांनी भरला राज्यसभेसाठी अर्ज

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारयांनी भरला राज्यसभेसाठी अर्ज

0

कार्यकर्त्यांनी केली जाहीरपणे नाराजी व्यक्त

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नितीश कुमार तब्बल 2 दशके मुख्यमंत्री राहिले आहेत. गेल्या डिसेंबरमध्येच त्यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र नितीश कुमार यांच्या निर्णयाने त्यांच्या संयुक्त जनता दलाचे कार्यकर्ते दुखावले आहेत. नितीश यांनी राज्यात राहून सरकारचे नेतृत्त्व करावे, अशी त्यांची इच्छा असून त्यांच्या इच्छेविरुद्ध ही घटना घडल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित होते. नितीश कुमार अर्ज भरणार असल्याने शहा दिल्लीहून पाटण्याला आले होते. आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पक्षाच्या कार्यालयात गोंधळ घातला. जेडीयूच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पण कार्यकर्ते जेवले नाहीत. त्यांची नाराजी अगदी स्पष्ट दिसत होती.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर भारतीय जनता पक्षाचा चेहरा पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेचा खासदार होण्याची आपली जुनी इच्छा असल्याचे सांगितले.
स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझे पूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन असेल. असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तुमचा विश्वास आणि पाठिंबा सातत्याने मला लाभला आहे. याच ताकदीमुळे आम्ही बिहार आणि तुमच्या सर्वांची पूर्ण निष्ठेने सेवा केली असल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.