बारावीचा निकाल येत्या दोन दिवसांत ः मुख्यमंत्री

0
38

राज्यातील बारावीचा निकाल येत्या २ दिवसात जाहीर केला जाणार आहे. गोवा बोर्डाचे अध्यक्ष निकालाची निश्‍चित तारीख जाहीर करतील, अस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तुये पेडणे येथे आयआयटी संकुल उभारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
तुये येथे आयआयटी संकुल सुरू करण्याचे उद्दिष्ट नाही. राज्यात आयआयटीसाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. आयआयटीसाठी लवकरच जमीन निश्‍चित केली जाणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.