आत्मनिर्भर भारताचे युवक आधारस्तंभ

0
124

>> युवा कौशल्य दिनी तरुणांना मोदींचे मार्गदर्शन

युवकांचे कौशल्य हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. तरुणांच्या नव्या पिढीचा कौशल्य विकास, एक राष्ट्रीय गरज असून आत्मनिर्भर भारताचा एक खूप मोठा आधार आहे. गेल्या ६ वर्षात बनलेल्या नव्या संस्थांच्या पूर्ण ताकदीने आपल्याला स्किल इंडिया मिशनला गती द्यावी लागेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले. काल दि. १५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.

आज कौशल्यांना जास्त मागणी आहे. जगासाठी भारताकडे स्मार्ट आणि कौशल्यवान मनुष्यबळ आहे. स्किल इंडियाचे ध्येय आपल्याला नव्याने चालवायचे आहे. कौशल्याद्वारे स्वत: आणि देशाला स्वावलंबी बनवले पाहिजे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना मोदी यांनी, आज लर्निंगसोबत अर्निंगही महत्वाचे आहे. जो कोणीही कौशल्यवान असेल तो पुढे जाईल असे सांगितले.