बंगालची आघाडी १७७ धावांवर

0
122

>> अमोघचे शतक; गोवा सर्वबाद ३१०

गोव्याचा पहिला डाव ३१० धावांवर संपुष्टात आणल्यानंतर बंगालने आपल्या दुसर्‍या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात १०८ अशी धावसंख्या उभारली असून एकूण १७७ धावांची आघाडी घेतली आहे.
काल दुसर्‍या दिवसाच्या ५ बाद १९१ धावांवरून पुढे खेळताना गोव्याचा पहिला डाव ३१० धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवसाचा नाबाद खेळाडू अमोघ देसाईने १४ चौकारांच्या सहाय्याने नाबाद १०३ धावांची शतकी खेळी केली. कीनन वाझने ८ चौकारांनिशी ६० धावांचे योगदान दिले. हेरंब परबने २९ तर अमुल्य पांड्रेकरने ११ धावा जोडल्या. बंगालतर्फे अशोक डिंडाने ५, कनिष्क शेटने ३ तर बोड्डुपल्ली अमितने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण ६९ धावांची आघाडी घेऊन खेळपट्टीवर उतरलेल्या बंगालने दुसर्‍यात डावात ३ गडी गमावत १०८ धावा बनविल्या आहेत. अभिषेक रमणला (१०) बाद करीत लक्षय गर्गने गोव्याला पहिले यश मिळवून दिले. ५ चौकारांनिशी ३५ धावांची खेळी केलेला सुदीप चॅटर्जीला फेलिक्स आलेमावावने पायचितच्या जाळ्यात अडकविले. तर कर्णधार मनोज तिवारी (२) लक्षयच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन परतला. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बंगालने आपली आघाडी १७७ धावांवर पोहोचवली असून अभिमन्यू इश्वरन (२०) व श्रीवत्स गोस्वामी (१५) धावांवर नाबाद खेळत होते.