ऑस्ट्रेलियाने ब्रिसबेन कसोटी जिंकली

0
65

कॅमारून बॅनक्रॉफ्ट (नाबाद ८२) आणि डेव्हिड वॉर्नर (नाबाद ८७) यांनी दमदार अर्धशतकांसह दिलेल्या १७३ धावांच्या अविभक्त सलामीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील पहिली कसोटी १० गड्यांनी जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे. ब्रिसबेन येथे खेळविण्यात आलेल्या या कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ ५६ धावांची आवश्यकता होती. ती त्यानी चौथ्या दिवसाच्या बिनबाद ११४ धावांवरून पुढे खेळताना एकही गडी न गमावता गाठली.