फा. बिस्मार्क प्रकरण चर्चसाठी महत्वाचे नव्हते काय?

0
106

>> गोवा फॉरवर्ड पक्षाचा सवाल

राज्यातील भाजप सरकारमधील घटक पक्ष असलेला गोवा फॉरवर्ड पक्ष कुणालाही गोव्यातील जातीय सलोखा बिघडवू देणार नाही, असे पक्षाचे प्रमुख प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी राज्यातील जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले असल्याचे डिमेलो यावेळी म्हणाले.
राज्यातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक प्रतिकांवर हल्ले करण्याचा ज्या घटना घडल्या होत्या त्यासंबंधी पणजी व वाळपई पोटनिवडणुका जवळ आलेल्या असताना चर्चने स्वतंत्र तपासकामाच्या नावाने जो गोंधळ घातला त्यावर टीका करताना डिमेलो म्हणाले की काही वर्षांपूर्वी फादर बिस्मार्क यांचा जो संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता त्यावेळी चर्चने का आवाज काढला नव्हता. एका धर्मगुरुची हत्या ही चर्चसाठी महत्वाची बाब नव्हती काय, असा प्रश्‍न त्यांनी केला.