प्रा. सुभाष वेलिंगकरांचा शोध सुरुच

0
6

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी डिचोली पोलीस प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा राज्यात आणि राज्याबाहेर शोध घेत आहेत. तथापि, अद्यापपर्यंत ते पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. दरम्यान, वेलिंगकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाला अद्याप उच्च न्यायालयात आव्हान दिलेले नाही. त्यांनी आपल्या पुढील कृतीचे गूढ कायम ठेवले आहे.

येथील जिल्हा सत्र न्यायालयाने प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधण्याच्या मोहिमेला गती दिली आहे. राज्य आणि शेजारी महाराष्ट्रातील काही भागात वेलिंगकर यांचा शोध घेतला जात आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक पोलीस पथके नेमली आहेत.
सुभाष वेलिंगकर यांनी डिचोली पोलिसांच्या चौकशीला हजर राहण्यासंबंधीच्या दोन नोटिसा धुडकावल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने निकालपत्रात नोंदविले आहे.