Home Featured हरियाणातील मतदारांचा भाजपवर विश्वास : तानावडे

हरियाणातील मतदारांचा भाजपवर विश्वास : तानावडे

0

हरियाणा राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजपला निवडून आणून मतदारांनी भाजप सरकारवर आपला विश्वास आहे, हे दाखवून दिले आहे, असे काल गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पक्षाला हरियाणात सलग तिसऱ्यांदा जो विजय मिळाला आहे, त्यासाठी आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत असल्याचे तानावडे म्हणाले. या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत पक्षाला जरी विजय मिळाला नसला तरी 29 जागा तिथे पक्षाला मिळाल्या आहेत. आम्हाला आणखी थोडा जास्त जागांची अपेक्षा होती, असे तानावडे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र, बिहार व झारखंड विधानसभा निवडणुकांतही भाजपचाच विजय होईल, असा दावाही तानावडे यांनी यावेळी केला.