प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

0
21

संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणार्‍या फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये २०१९, २०२० आणि २०२१ असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मराठी रंगभूमीवरील चिरतरुण अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

शास्त्रीय गायनासाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल आरती अंकलीकर टिकेकर यांना, तर ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका मीना नाईक यांना पपेट्रीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तिघांनाही २०२० सालासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणार्‍या कलाकारांना सन्मानित केले जाते.