Home Featured पेडण्यातील दोन अपघातांत दोघे ठार

पेडण्यातील दोन अपघातांत दोघे ठार

0

>> तोरसेे येथे कुडाळच्या तरुणाचा मृत्यू

पेडणे तालुक्यात काल गुरूवारी दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.
तोरसे – पेडणे येथील बीएड कॉलेजनजीक झालेल्या मोटारसायकल व टेम्पो यांच्यातील अपघातात कुडाळ येथील योगेश परब (२७) हा युवक जागीच ठार झाला. काल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. योगेश हा गोव्यात दुचाकीने येत असताना कामानिमित्त येत असताना तोरसे येथे समोरुन येणार्‍या टेम्पोने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. यामुळे योगेश याचा जागीच मृत्यू झाला. पेडणे पोलिसांनी पंचाना केला असून या प्रकरणी तपास सुरू आहे.

मोरजीत सायकलस्वाराचे निधन

न्यूवाडा मोरजी येथे काल दि. २३ रोजी सकाळी ९ वाजता आपल्या सायकलने तेथीलच एका हॉटेलात कामाला जाणारे आगोस्तीन ऊर्फ काल्लू फर्नांडिस (६६) यांना समोरून सुसाट वेगाने येणार्‍या दुचाकीने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आगोस्तीन हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना शिवोली इस्पितळात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना गोमेकॉत नेताना वाटेतच त्यांचे निधन झाले.
जीए ११ बी ७९६१ ही दुचाकी आश्‍वे मांद्रे येथील एक युवती चालवत होती. हा अपघात पाहिलेल्यांनी सदर युवती सुसाट वेगाने वाहन चालवत असल्याचे सांगितले. याविषयी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी माहिती देताना सदर युवतीकडे जन्मदाखला मागितला असून ती उद्या सादर करणार असल्याचे सांगितले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. मृतदेहाची शवचिकित्सा करून सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावर आज दि. २४ रोजी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.