पंजाबात दहशतवादी घातपाताचा कट उधळला, तिघांना ताब्यात

0
34

दहशतवादाविरुद्ध कारवाई करत पंजाब पोलिसांनी हत्यारे आणि स्फोटकांसहीत तीन जणांना अटक केले. पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दहशतवादी कारवायांना आळा बसला. पंजाबच्या तरनतारण जिह्यात घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या या तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण क्षेत्राला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.

अटक केलेले तीनही दहशतवादी पंजाबच्याच मोगा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. स्टेशन प्रभारी नवदीप सिंह आपल्या टीमसोबत गस्तीवर असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली जाणवल्या. जिल्ह्यातील भगवानपुरा नाक्याजवळ पोलिसांच्या टीमने एका संशयास्पद गाडीला रोखलं. या गाडीतून तीन जण प्रवास करत होते. त्यांची चौकशी करून झडती घेतली असता गाडीत हत्यारे आणि स्फोटके सापडली.