पेट्रोल, डिझेलच्या दरात किंचित कपात

0
84

पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रती लिटर अनुक्रमे १ रु. ४२ पैसे व २ रु. अशी कपात करण्यात आली आहे. हा दर बदल काल मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. या इंधनांच्या दरात जुलै महिन्यात झालेली ही तिसरी कपात आहे. गेल्या १६ जुलै रोजी पेट्रोलच्या दरात २ रु. २५ पैशांनी कपात झाली होती. तर डिझेल ४२ पैशांनी स्वस्त झाले होते.