Home Featured पुडुचेरीत बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे सरकारला निर्देश

पुडुचेरीत बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे सरकारला निर्देश

0

पुडुचेरीत अल्प मतात आलेल्या कॉंग्रेस सरकारला नायब राज्यपाल टी. सुंदरराजन यांनी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. येत्या ३ ते ४ महिन्यांत होणार विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यापूर्वीच एका महिन्यात कॉंग्रेसच्या ४ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आले आहे. किरण बेदी यांना नायब राज्यपाल पदावरून हटवल्यानंतर तेलंगणच्या राज्यपाल सुंदरराजन यांच्याकडे पुडुचेरीच्या नायब राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. सुंदरराजन यांनी नायब राज्यपालपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

कॉंग्रेसच्या काही आमदारांच्या राजीनाम्यानंतर पुदुच्चेरीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी आज नायब राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर विरोधी पक्षनेतेही नायब राज्यपालांना भेटले. सरकार अल्पमतात असल्याचा दावा विरोधी पक्षाने केला आहे. तसेच मुख्यमंत्री नारायणसामी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली आहे.