पश्‍चिम बंगालमध्ये भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला

0
88

पश्चिम बंगालमध्ये भाजप उत्तर कोलकाता जिल्ह्याध्यक्ष शिबाजीसिंह रॉय यांच्यावर फूल बागान भागात जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात रॉय हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अगोदर तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालचे श्रममंत्री जाकिर हुसैन यांच्यावरही काही अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्ब हल्ला केला होता.

रॉय यांच्यावरील हा हल्ला तृणमूल कॉंग्रेसने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. बुधवारी झालेल्या एका रॅलीनंतर हा हल्ला झाला. यावेळी अज्ञातांकडून रॉय यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी आणि शंकुदेब हेदेखील जखमी झाले आहेत.