जम्मू-काश्मीरमधील पुंछच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला बुधवारी भारतीय लष्कराने ठार केले. त्याच्याकडून साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच एका दहशतवाद्याला गोळी लागून तो जखमी झाला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांनी सरकारी शाळेतील मशकूर अहमद या शिक्षकासह दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर मदत केल्याचा आरोप आहे. सदर शिक्षक जैश-ए-मोहम्मदचा कमांडर सैफुल्लाहच्या संपर्कात होता.