Home Featured मनोज परब व वीरेश बोरकर यांच्यासमर्थकांत आरोप प्रत्यारोप सुरूच

मनोज परब व वीरेश बोरकर यांच्यासमर्थकांत आरोप प्रत्यारोप सुरूच

0

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) प्रमुख मनोज परब आणि आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांच्या समर्थकांत समाजमाध्यमावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तथापि, आरजीपीचे प्रमुख मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्याकडून समाजमाध्यमावरून सुरू वादाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही. आरजीपीमधील अर्तंगत वादामुळे पक्ष संघटनेत दुफळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
गोवा विधानसभेच्या 2022 च्या निवडणुकीत आरजीपीला सुमारे 90 हजार मते मिळाली होती. तसेच, सांत आंद्रे मतदारसंघातून आरजीपीचा उमेदवार निवडून आला होता. राज्यातील आगामी 2027 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजीपी हा प्रादेशिक पक्ष आपले पक्ष संघटन बळकट करण्यापेक्षा अंतर्गत वादामुळे जास्त चर्चेत आहे.