पित्तशामक ‘लिंबू’

0
497
  • डॉ. मनाली म. पवार
    सांतईनेज-पणजी

लिंबू तसा सर्वांनाच परिचित आहे, पण तरीही लिंबाचे योग्य गुणधर्म व उपयोग माहीत असणे गरजेचे आहे. लिंबाचा उपयोग केसांपासून ते सर्व शरीरावर व मनावरही होतो. लिंबू पंचांगाचा औषधी उपयोग होतो. फक्त वैद्याच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.

लिंबू-पाणी कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडते. आहारात लिंबाचा विविध तर्‍हेने उपयोग केला जातो. लिंबाचे लोणचे, लिंबाचे सरबत, खाद्यपदार्तात चव आणण्यासाठी, पदार्थ (मासे-मटण) मॅरिनेट करण्यासाठी लिंबाची केक काय नि लिंबाचा क्रॅश काय- लिंबू पित्तशामक व आरोग्यदायी आहे, या हेतूने बरेच जण लिंबाचे या ना त्या पद्धतीने सेवन करतात. ऍसिडिटीचा त्रास झाल्यास बरेच जण काळ्या चहामध्ये लिंबू पिळून- बनवून पितात जो सध्या लेमन टी- म्हणून प्रचलीत आहे.

लिंबू तसा सर्वांनाच परिचित आहे, पण तरीही लिंबाचे योग्य गुणधर्म व उपयोग माहीत असणे गरजेचे आहे. लिंबू हे व्हिटामिन-सीचा मुख्य स्रोत आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये स्कर्वी रोगनिवारक गुण आढळतात. जसे कागदी लिंबू, बिजौरी लिंबू, जम्मीरी लिंबू, गोड लिंबू, ईडलिंबू इत्यादी. पण औषधी उपयोगासाठी नेहमी कागदी लिंबाचाच वापर करण्यात येतो.

लिंबाची पाने चमकदार हिरव्या रंगाची, टोकदार आणि चिरस्थायी असतात. पाने चुरगळल्यास सुगंध येतो. याची फुले लहान, श्‍वेत अथवा गुलाबी रंगाची सुगंधित असतात. फळ गोलाकार ते अंडाकार, हिरव्या आणि पिवळ्या रंगाची, गुळगुळीत आणि बिया संख्येत अनेक, पिवळ्या-पांढर्‍या रंगाच्या गुळगुळीत असतात. याचा पुष्पकाळ एप्रिल ते मेपर्यंत. फळकाळ मेपासून जूनपर्यंत असतो.

लिंबाचे आयुर्वेदिक गुणधर्म –

  • कागदी लिंबू आंबट, वातशामक, दीपक- पाचक आणि लघु असते.
    लिंबू कृमीनाशक, पोटदुखीनाशक, गृहबाधा नाशक, रुचीकारक, वात-पित्त-कफ विकारात अत्यंत लाभदायक.
  • लिंबाची फळे अम्ल, तिक्त, स्तंभक, तापजनन, विरेचक, क्षुधावर्धक, पाचक, पूरोधक, स्वेदजनन आणि कृमिघ्न असतात.
  • लिंबू मृदू विरेचक, ज्वरघ्न आणि प्रशामक असते.
  • लिंबाचे सार अनॉक्सीकारक क्रियाशीलता प्रदर्शित करते.
  • लिंबाचे मेथेनॉल जिवाणुरोधी क्रियाशीलता प्रदर्शित करते.
  • लिंबाचा घट्ट स्वरस अर्बुद कोशिका रेखांवर प्रफलनरोधी प्रभाव प्रदर्शित करतो.
    लिंबाचे औषधी उपयोग –
    लिंबाचा उपयोग केसांपासून ते सर्व शरीरावर व मनावरही होतो. लिंबू पंचांगाचा औषधी उपयोग होतो. फक्त वैद्याच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.
  • डोक्याचे रोग –
    केश विकार – लिंबाच्या रसात आवळ्याचा गर वाटून हे मिश्रण केसांमध्ये लावल्यास कोंडा दूर होतो व केसगळती थांबते.
  • नेत्र रोग – लिंबाचा रस लोखंडी खलात खलून, रस काळा पडल्यावर डोळ्याच्या आजुबाजूला पातळ लेप केल्यास नेत्राची वेदना कमी होते.
  • तोंडाचे रोग – तोंड आल्यास लिंबाची साल जिभेवर, हिरड्यांवर चोळावी व २०-३० मिली रस सेवन करावा.
  • पोटाचे विकार –
    पोटदुखी – १-२ ग्रॅम कच्चा लिंबाची साले वाटून खाल्ल्यास पोटदुखी थांबते.
    उलटी – जेवणानंतर लगेच उलटी होत असल्यास ५-१० मिली लिंबाचा स्वरस प्यावा
    मंदाग्नी – एका लिंबाच्या रसात थोडे आले, काळे मीठ मिसळून घेतल्यास अजीर्ण, मंदाग्नी आणि आमवाताचे शमन होते.
    अजीर्ण व पोटदुखी – ३ मिली लिंबाचा रस, १० मिली चुन्याचे पाणी आणि मध तिघांना एकत्र करून २०-२० थेंब प्रमाणात घेतल्यास अजीर्ण व पोटदुखीचे शमन होते.
    अरुची – लिंबू कापून त्यावर काळे मीठ टाकून चाखल्यास अरुचीचे शमन होते.
  • कृमी रोग – लिंबाचा रस प्यायल्यामुळे आतड्यांच्या आतील टायफॉइड, अतिसार, इ.चे किटाणू मरतात.
    पटकी – भोजनाच्या आधी दररोज दोन लिंबांचा रस प्यायल्यास पटकीत लाभ होतो.
    अतिसार – ३० मिली. लिंबाचा स्वरस दिवसातून २-३ वेळा प्यायल्यास अतिसारात लाभ होतो.
    ५ मिली. स्वरसात मध मिसळून प्यायल्यास अजीर्ण, आम्लपित्त, पित्तज सर्दी आणि तोंडात सतत पाणी सुटणे यात लाभ होतो.
    लिंबाच्या स्वरसात समप्रमाणात कांद्याचा रस व कापूर मिसळून घेतल्यास विसूचिका, प्रवाहिका, अन्नविषबाधा यांमध्ये लाभ होतो.
  • लिंबाच्या पानाच्या स्वरसात मध मिसळून घेतल्यास पोटातील कृमींचे निःसारण होते.
  • वृक्कबस्ति रोग –
    मूत्राशय सूज – लिंबाच्या स्वरसाला उकळलेल्या पाण्यात मिसळून प्यायल्यास मूत्राशय सूज, रक्तस्रावात लाभ होतो.
  • यकृत -प्लिहा रोग –
    कावीळ – लिंबाचा रस डोळ्यास लावल्यास कावीळीत लाभ होतो.
    यकृत विकार – कोमट पाण्यात लिंबाचा रस व साखर मिसळून सकाळी चहाप्रमाणे प्यायल्यास यकृताची क्रिया सुधारते.
  • लिंबाच्या रसात थोडा ओवा व सेंधव मीठ मिसळून घेतल्यास यकृत आणि प्लिहेच्या रोगात लाभ होतो.
  • अस्थिसंधी रोग –
    आमवात – १-२ मिली. लिंबाच्या स्वरसाला ४-५ तासाच्या अंतराने घेतल्यास आमवातामध्ये लाभ होतो.
  • त्वचा रोग –
    चर्म रोग – गजकर्ण, खरूज, त्वचेवर काळे डाग इ. रोगांवर लिंबू कापून रगडल्यास लाभ होतो.
    त्वचाविकार – लिंबाचा रस दररोज घेतल्यास त्वचेचा कोरडेपणा आणि त्वचा वैवर्ण्यामध्ये लाभ होतो.
    मुरुमं, पुटकुळ्या – लिंबाचा रस चेहर्‍यावर चोळल्यास लाभ होतो.
    चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लिंबाच्या रसात मध मिसळून कोमट पाण्यातून चेहर्‍यावर लावावा.
  • मानसिक रोग –
    उन्माद – लिंबाच्या रसाचा मस्तकावर लेप केल्यास उन्मादात लाभ होतो.
    इतर शरीर रोग –
  • स्थौल्य – लिंबाच्या रसात जुना मध मिसळून कोमट पाण्यातून दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यावे. पाणी गरम नसावे. कारण मध कधीच उष्ण करू नये.
  • ताप – २५ मिली लिंबाचा रस, २५ मिली. चिरायताचा काढा दोन्ही एकत्र करून थोडे- थोडे लावल्यास ताप ठीक होतो.
    अशा प्रकारे औषधी आणि आहार दोन्ही स्वरूपात वापरल्या जाणार्‍या लिंबाला घरात विशेष स्थान देऊन आपण अनेक प्रकारच्या रोगांपासून स्वतःला वाचवू शकतो.