पाच राज्यांतील विजयी मिरवणुकांवर बंदी

0
131

देशातील वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही. येत्या २ मे रोजी होणार्‍या मतमोजणीदरम्यान कोरोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णा द्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेनंतर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने ही बंदी घातली.