चोवीस तासांत देशात २.५१ लाख कोरोनामुक्त

0
137

भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ बाधित रुग्णांची नोंद झाली असून २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याचसोबत देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले असून आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख ८२ हजार २०४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचे लसीकरण झाले आहे.