पाच जणांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

0
109

नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. या हत्याकांडानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली.

नागपुरच्या पाचपावली भागात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. त्यानंतर तिथेच थोड्या अंतरावरील सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. त्यानंतर तो पुन्हा आपल्या घऱी आला आणि त्याने गळफास घेत आत्महत्या करून आपले जीवन संपवले. रविवारी रात्री हा सगळा प्रकार घडला असून, तो सोमवारी सकाळी उघडकीस आला.

पोलिसांनी पंचनामा केला असून, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.