पाक हल्ल्यांमुळे आणखी एक जवान धारातीर्थी

0
85

जम्मू-काश्मीर सीमेलगत स्थिती गंभीर
एका दिवसांच्या विश्रांतीनंतर पाक सैनिकांनी जम्मू काश्मीरमधील कठुआ व सांबा या क्षेत्रातील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) २० चौक्यांवर काल बेफाम गोळीबार केला. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. कॉन्स्टेबल दविंदर कुमार असे या जवानाचे नाव आहे.दरम्यान, भारत-पाक सीमेवरील युद्धसदृश्य चकमकींमुळे सीमा भागातील सुमारे साडेतीन हजार लोकांना घरे सोडून अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे.
गेल्या आठवड्यात पाक रेंजर्सच्या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले होते. तसेच एक महिलाही ठार झाली होती.
कुठआचे उपायुक्त इकबाल चौधरी यांनी सांगितले की, पाक सैनिकांच्या अंदाधुंद हल्ल्यांमुळे ५७ खेड्यांमधील सुमारे पाच हजार ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. गोळीबार थांबत नसल्याने त्यांच्यासाठी मदतकार्य राबविणेही कठीण झाले आहे. आधी पाक सैनिक छोट्या बंदुकांनी मारा करीत होते. मात्र आता उखळी तोफांचा जोरदार मारा केला जात असून स्थिती गंभीर बनली असल्याचे चौधरी म्हणाले.