Home बातम्या पाक-अफगाणिस्तानचेएकमेकांवर हवाई हल्ले

पाक-अफगाणिस्तानचेएकमेकांवर हवाई हल्ले

0

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादाने आता अत्यंत हिंसक वळण घेतले असून, दोन्ही देशांमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याने संघर्ष सुरू झाला. 22 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानात झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले.

गुरुवारी उशिरा रात्री अफगाणिस्तानने कुनार प्रांतात केलेल्या भीषण हल्ल्यात तब्बल 55 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी केला आहे. अफगाणिस्तानने इस्लामाबादच्या फैजाबाद लष्करी तळासह अनेक प्रमुख लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तान सरकारने ऑपरेशन गझब लिल हक सुरू केले आणि काबूल आणि नांगरहार प्रांतासह अनेक शहरांमध्ये हवाई हल्ले केले. पाकिस्तानने या हवाई हल्ल्यात 133 अफगाण सैनिक मारल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमधील संघर्षात सुमारे 200 लोक मारले गेल्याचे वृत्त आहे.