रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) प्रमुख मनोज परब यांनी आम आदमी पक्षासमोर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे, अशी माहिती आपचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनी काल पत्रकारांशी बोलताना येथे दिली.
आरजीपीशी हातमिळवणी करण्याची आमची तयारी आहे. लोकांच्या हिताचे रक्षण करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. या आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असेही व्हिएगस यांनी सांगितले.
भाजपने आपच्या दोन्ही आमदारांना फोडण्याचा भरपूर प्रयत्न केला. आम्हाला वेगळे करण्यासाठी अनेक ऑफर दिल्या. तथापि, आम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाहीत. आम्ही दोघेही ‘आप’शी एकनिष्ठ राहून कार्य करीत आहोत. 2027 च्या निवडणुकीमध्ये मध्ये आमचे सरकार स्थापन करण्याचे ध्येय आहे, असेही व्हिएगस यांनी सांगितले.