पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

0
157

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या टप्प्यात लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. चाचणीच्या प्राथमिक टप्प्यातील निकालांनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या स्वयंसेवकांना लशीचे प्रत्येकी दोन डोस देण्यात आले असून त्यांच्यावर कोणतेही साईड् इफेक्ट जाणवले नाहीत. हे स्वयंसेवक सध्या पूर्णपणे देखरेखीखाली असून देशातील काही शहरांमध्ये भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्यांच्या लशीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. आता स्वयंसेवकांना लसीचा दुसरा डोस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू असून त्याद्वारे अभ्यास करण्यात येणार आहे.