Home बातम्या पर्वरीत आयआरबी पोलिसाचा संशयास्पद मृत्यू

पर्वरीत आयआरबी पोलिसाचा संशयास्पद मृत्यू

0

पर्वरी येथील होली फॅमिली मैदानासमोरील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑङ्ग ओपन स्कूलच्या आवारात आयआरबी पोलिसाचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळून आला. घराच्या बाल्कनीच्या बाजूकडील जमिनीवर त्याचा मृतदेह पडलेल्या आणि चेहर्‍यावर व शरीरावर जखमा झालेल्या स्थितीत असल्याने त्याचा खून झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मृताचे नाव किशोर शिरोडकर (३७) असून तो मोरजी (पेडणे) येथील आहे. सध्या तो पर्वरी (सुकूर) येथे आपल्या पत्नीसह वास्तव्यास होता. त्याला दोन मुले आहेत. कोलवाळ येथील तुरुंगात त्याची हल्लीच पोस्टिंग झाली होती असे समजते.
घटनास्थळी महसूलमंत्री रोहन खंवटे, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, उत्तर गोवाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी भेट दिली. तसेच त्याचा भाऊ राजेश शिरोडकर आणि मित्रमंडळी घटनास्थळी उपस्थित होते.
ही घटना बुधवारी रात्री घडल्याचे दिसून येते. त्याच ठिकाणी आडव्या पडलेल्या स्थितीतील व्हेस्पा स्कूटर (जीए ०३ एबी ४४९३) आणि बियरच्या बाटल्या पडलेल्या होत्या. तसेच त्याच्या तोंडात प्लॅस्टिक बॅग कोंबलेली होती. त्याचा शर्टही ङ्गाटलेल्या स्थितीत आढळून आला आहे. कदाचित वादावादीतून खुनासारखा प्रकार घडला असावा. पोलिसांना सकाळी अज्ञात व्यक्तीने ङ्गोन केल्यावर पर्वरी पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्वेश गड्डी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोचले. त्यांनी पंचनामा केला. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉमध्ये पाठविण्यात आला. निरीक्षक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आत्महत्येचा संशय
दरम्यान, किशोर यांच्या चेहर्‍यावर दिसत असलेल्या रक्ताच्या डागामुळे त्यांचा खून झाला असावा असा तर्क वर्तविण्यात येत होता. परंतु डॉक्टरानी दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार तो खून नसून त्याने स्वतः आत्महत्या केली आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पर्वरी पोलिसांनी ‘अनैसर्गिक मृत्यू’ अशी नोंद केल्याची माहिती उपअधीक्षक सेराङ्गिन डायस यांनी दिली. त्या घराच्या व्हरांड्याच्या खांबाला नायलॉनसदृश दोरी लटकवलेली आहे. ती दोरी तुटून तो खाली पडला आहे. पोलिसांच्या मतानुसार मृतदेहाच्या वजनाने दोर तुटण्याची शक्यता आहे.