पर्रीकर सरकार कधीही कोसळू शकते ः कॉंग्रेस

0
115

जनाधार नसताना सत्तेवर आलेले मनोहर पर्रीकर यांचे सरकार कधीही कोसळू शकते. मात्र, त्यांचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत की काय याविषयी आपणाला काहीही
माहीत नसल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला नव्हता. सर्वांत मोठा एकेरी पक्ष भाजप नव्हे तर कॉंग्रेस होता. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसला संधी द्यायला हवी होती. मात्र, तसे न घडता भाजपने छोट्या पक्षांना गळाला लावून सरकार स्थापन केल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.
लोकांच्या पाठिंब्याशिवाय सत्तेवर आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते असे सांगून पुढे काय होईल हे आताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन ङ्गालेरो यांनी जो प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे त्याबाबत उद्यापर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.