पत्रादेवी तपासणी नाक्यावर १२ लाखांची दारू जप्त

0
36

>> अबकारी खात्याची कारवाई, वाहनचालक फरार

पत्रादेवी तपासणी नाक्यावर अबकारी विभागाने निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या नैतृत्वाखाली काल १२ लाख १४ हजार ८८० रुपयांची दारू जप्त केली. तसेच यावेळी १७ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले असून वाहन चालक फरारी झाला आहे.

काल दि. २३ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एमएच १६ सीसी ८२०० हे वाहन पत्रादेवीमार्गे पनवेल येथे जात होते. पत्रादेवी अबकारी तपासणी नाक्यावर वाहन थांबवले परंतु चालक कागदपत्रे घेऊन नाक्यावर आला नाही. यावेळी त्याला माहिती विचारली असता ती तो नीट देऊ शकला नाही. अधिकारी वाहन तपासत असतानाच चालकाने गाडीच्या चावीसह तेथून पोबारा केला. अधिकार्‍यांना त्यामुळे संशय आला. त्यांनी तपासणी केली असता, वाहनाची परमिट असलेले नक्कल प्रत व एक आधारकार्ड सापडले. तसेच बिअरचे ३३० खोके, विदेशी दारु सापडली.

या कारवाईत निरीक्षक अमोल हरवळकर, दिलीप तिळवे, नीलेश गावडे, शंकर पर्येंकर, देविदास नाईक, विठोबा मालवणकर व सतीश तिळवे आदींचा सहभाग होता.