गोव्यातून मान्सून परतला

0
114

हवामान विभागाने दक्षिण पश्‍चिम मान्सून गोव्यातून परतल्याचे काल जाहीर केले. यंदाच्या पावसाळी हंगामात १००.६ इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार १४ टक्के पाऊस कमी पडला. वाळपई येथे सर्वांधिक १३२ इंच पावसाची नोंद झाली तर मुरगाव येथे सवार्ंत कमी ७६ इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासात ढगाळ वातावरण होते. कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २४.६ अंश सेल्सियस नोंद झाले. आर्द्रता ९० टक्के नोंद झाली आहे.