पंचायत सचिवाकडून तरुणीचा विनयभंग

0
2

उसगाव पंचायतीच्या सचिवाने कार्यालयात कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याची रितसर तक्रार पंचायत संचालक, फोंडा गट विकास अधिकारी व फोंडा पोलीस स्थानकात दिली. यानंतर काल रात्री उशिरा फोंडा पोलिसांनी पंचायत सचिव होनाजी अनिल मोरजकर (रा. साखळी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.
उसगाव पंचायत क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करून महसूल वाढविण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय पंचायत मंडळाने घेतला होता. त्यानुसार पंचायत सचिवाने एकूण सहा तरुणी व एका तरुणाला कंत्राटी पद्धतीने ऑक्टोबरपासून कामावर घेतले होते. त्यानंतर पंचायत सचिवाने एका तरुणीला मोबाईलवरून अश्लील संदेश पाठविण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर विनयभंग करण्याचाही प्रकार घडला. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आली. निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहे. दरम्यान, कंत्राट पद्धतीवर काम करणारा सात जणांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये मानधन ठरविण्यात आले होते. पण प्रत्यक्षात मानधनासाठी 24 हजार रुपयांचे धनादेश काढले जात होते. यापैकी 9 हजार रुपये त्यांच्याकडून परत घेतले जात होते. त्यात सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे.