पंचायत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा प्रभाग फेररचनेनंतर

0
132

>> राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती

पंचायत निवडणुकांसाठी आवश्यक असलेले प्रभाग ङ्गेररचनेचे काम सरकार पूर्ण करणार असून ते पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.
दि. २६ मे रोजी १८६ पंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे. या मुदतीच निवडणूक घेण्याची आयोगाची तयारी होती. परंतु प्रभाग ङ्गेररचनेचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असून ते पूर्ण झाले नव्हते. विधानसभा निवडणुकीचे काम व अन्य कारणांमुळे अडचण निर्माण झाल्याचे सरकारने कळविले होते. त्यामुळे निवडणुका मुदतीच्या आत घेणे शक्य नव्हते. प्रभाग ङ्गेररचनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करता येत नाही असे श्रीवास्तव यांनी
सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने १२ जून रोजी किंवा त्यापूर्वी निवडणुका घेण्याचा आदेश सरकारला दिला आहे. त्यानुसार निवडणुका घेणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. पंचायत निवडणुकीसाठी संबंधित कायद्यातील दुरुस्तीनुसार प्रक्रियेसाठी ७ दिवस ठेवले आहेत. परंतु आयोगाने दहा दिवस प्रक्रियेसाठी देण्याचे ठरविले आहेत.
पंचायत कायद्यानुसार वरील निवडणुका मतपत्रिकांच्या माध्यमातून घेतल्या जाईल, असेही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.

प्रभाग आरक्षणावर
अद्याप निर्णय नाही
पंचायत प्रभागांच्या ङ्गेररचनेचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप आरक्षणावर निर्णय झालेला नाही, अशी माहिती पंचायत खात्याच्या सूत्रांनी दिली. वेगवेगळ्या १६ पंचायतीत मिळून एकूण ३९ प्रभागांमध्ये वाढ झाली आहे. अनुसूचित जमातीने प्रभाग आरक्षित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अभ्यासाअंती कोणते प्रभाग आरक्षित करावेत ते ठरविण्यात येणार आहे. याविषयीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.