पंचायत निवडणुका १२ जूनपर्यंत घ्या

0
84

>> वाहतूक मंत्र्यांची माहिती

राज्यातील पंचायत निवडणुका येत्या दि. १२ जून पर्यंत घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काल सरकारला दिला. त्यामुळे दि. १७ जून रोजी निवडणुका घेण्याचा सरकारचा बेत ङ्गसला आहे.
सरकारने वरील निवडणुका १७ जून रोजी घेण्याचे निश्‍चित करून न्यायालयालाही तशी माहिती दिली होती. पंचायतींचा कार्यकाळ दि. २६ मे रोजी संपणार आहे. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व सरकारी कर्मचारी कामात गुंतल्याने प्रभाग ङ्गेररचनेचे काम अडले होते. मे महिन्यात निवडणुकीचे काम करणार्‍या बहुसंख्य सरकारी कर्मचार्‍यांनी रजेसाठी अर्ज केले होते.
त्यामुळे दि. २६ मे पूर्वी निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सरकारचे म्हणणे होते. त्यामुळे सरकारने प्रचारासाठी ङ्गक्त बारा दिवस देऊन दि. १७ जून ही तारीख निवडली होती. परंतु वरील प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. न्यायालयाने सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन वरील आदेश दिला आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक पंचायत परिसरातील विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे सरकारातील काही मंत्र्यांनी काल झालेल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोरही हा विषय उपस्थित केला होता.
निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करावी लागतील. त्यासाठी पर्वरीचे आमदार तथा महसूलमंत्री रोहन खंवटे यांच्यासह अनेक मंत्री व आमदारांनी कामे पूर्ण करून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.