अस्वच्छता करणार नाही असा संकल्प करा : मोदी

0
100

>> पतंजली संशोधन केंद्राचे उद्घाटन

उत्तम आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अस्वच्छता करणार नाही असा संकल्प करायला हवा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील हरिद्वार पतंजली संशोधन केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना केले. याप्रसंगी स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबांनी पंतप्रधानांचे कौतुक करताना राष्ट्रऋषी अशी पदवी दिली.
यावेळी मोदी म्हणाले की, आपण आपल्याला मिळालेला ऐतिहासिक वारसा कधीच विसरणार नाही, याची खात्री आहे. आपल्या पूर्वजांकडून मिळालेला सृजनशील वारसा तसाच पुढे नेऊ असा विश्वास त्यांनी दर्शवला.
जेवढे शक्य आहे त्यांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशातील लोकांच्या आशीर्वादावर पूर्णपणे विश्‍वास असून देशातील जनता ऊर्जेचा स्रोत असल्याचे मोदी म्हणाले.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी उत्तराखंडला भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी केदारनाथ येथे प्रार्थना केली व तेथे जमलेल्या लोकांशी संवाद साधला.