न्यायालयाचा आदेश न जुमानता मुंबईत दहीहंडी

0
71

सर्वोच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध धाब्यावर बसवत मुंबईत दरवर्षीप्रमाणे दहीहंडी साजरी करण्यात आली. काही गोविंदानी थरावर थर लावत न्यायालयाच्या ९ थर लावण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या गोविंदा पथकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या पथकांना त्यामुळे कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, काल शहरातील विविध भागात दहीहंडी वेळी ७० पेक्षा अधिक गोंविंदा जखमी होण्याच्या घटना घडल्या. यांपैकी ५४ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले तर १७ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मोजपट्टी तोंडात धरून तसेच उंचीच्या मर्यादेचे पालन करताना वरच्या थरातील गोविंदानी काळे झेंडे दाखवून न्यायालयाच्या आदेशाचा निषेध केला.