जीएसटीत चुका असल्यास चर्चेवेळी दाखवून देणार ः राणे

0
111

येत्या दि. ३१ रोजी होणार्‍या विशेष विधानसभा अधिवेशनात जीएसटी विधेयकावर चर्चा होऊन लोकसभेत आपल्या पक्षाने या विधेयकास पाठिंबा दिलेला आहे. आपण अद्याप विधेयकाचा तपशील पाहिलेला नाही. त्यात काही त्रुटी असल्यास त्या चर्चेच्यावेळी दाखवून दिल्या जातील, असे विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी सांगितले.

गोव्याला या विधेयकाचा कसा ङ्गायदा होईल, ते नंतर स्पष्ट होऊ शकेल, असेही ते म्हणाले. आम आदमी पक्षाने गोव्यात प्रवेश केल्याने त्याचा कॉंग्रेसवर परिणाम होईल काय, असे विचारले असता मुळीच नाही, असे सांगून वाळपईत पालिका निवडणुकीत आपच्या उमेदवाराला ङ्गक्त ४ मते मिळाली होती. कॉंग्रेस हा येथील पारंपरिक पक्ष आहे. दिल्लीत सत्ता हाती आल्यानंतर आप मिळेल तेथे उड्या मारत असला तरी गोव्यात त्याचा परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.
विद्यापीठ निवडणुकीत
सरकारचा हस्तक्षेप
विद्यापीठ मंडळाच्या निवडणुकीत सरकार हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करून विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा व कुलगुरुंनी त्यात हस्तक्षेप करून हे प्रकार थांबवावे असे आवाहन प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझीन ङ्गालेरो व विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी काल केले. आज विद्यापीठ मंडळाची निवडणूक आहे. मडगाव येथील रायतूरकर महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यांला निवडणुकीत भाग घेण्यास मज्जाव केल्याने त्यांनी वरील मागणी केली.

निवडणूक न लढविण्याबाबत
योग्यवेळी निर्णय घेणार
आगामी विधानसभा निवडणुकीत आपण पर्ये मतदारसंघातून निवडणूक लढविणार की नाही, याबाबत अद्याप काहीही ठरविलेले नाही. योग्यवेळी त्यावर विचार करू, असे सांगून अनेक युवा उमेदवार पुढे येत असल्याचे विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी काल पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर सांगितले. विरोधी नेते राणे यावेळी निवडणूक लढविणार नाही, अशी बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राणे यांना पत्रकारांनी वरील प्रश्‍न विचारला होता. राणे यांनी पर्येतून निवडणूक न लढविल्यास विश्‍वजित राणे पर्येतून निवडणूक लढवतील, अशीही चर्चा सुरू आहे.