नौदलासंदर्भातील गोव्याचे प्रश्‍न सहा महिन्यात सोडविणार : संरक्षणमंत्री

0
132

अंजदीव बेट तसेच नौदलाच्याबाबतीत गोव्याचे काही प्रश्‍न असल्यास ते पुढील सहा महिन्यात सोडविण्याचे आश्‍वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.सर्वच बाबतीत अन्य देशांवर अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे कठीणप्रसंगी कोणत्याही संकटाला तोंड देणे शक्य व्हावे यासाठी देशात शस्त्रसामुग्री तयार ठेवण्याची गरज असते. त्यादृष्टीकोनातून निर्णय घेणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. शस्त्र खरेदी करतानाही आपण देशाच्या हिताचा विचार करीन, असे आश्‍वासनही पर्रीकर यांनी दिले.