धारबांदोड्यातील बिबट्या अखेर जेरबंद

0
100
वनखात्याने लावलेल्या पिंजर्‍यात अडकलेला बिबटा. (छाया : एकनाथ खेडेकर)

धारबांदोडा-गिडगें शेटीमळ येथील एक रेडकू ठार करणार्‍या बिबट्याला गजाआड करण्यात वनखाते यशस्वी ठरले असून रविवार ३० रोजी रात्री लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्याला पकडण्यात आले. धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील गुरखे, तळसाय, गिडगें, शेटीमळ या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबटा धुडगूस घालून पाळीव जनावरे पळवित होता. अशी अनेक जनावरे या बिबट्यांने फस्त केली होती. अनेकवेळा नागरिकांना बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते. दि. २८ रोजी रात्री शिडगें शेटीमळ येथील दुधव्यवसायिक बाळकृष्ण मराठे यांच्या गोव्यातील रेडकांवर बिबट्याने हल्ला करून तर केले होते. काल सकाळी मराठे यांनी वन अधिकारी श्री. बेतकीकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
बेतकीकर यांनी २९ रोजी खास मोहिमेअंतर्गत घटनास्थळी पिंजरा लावण्यात आला. तद्नंतर पकडलेल्या बिबट्याची रवानगी बोंडला अभयारण्यात केली असल्याची माहिती वनखात्याचे अधिकारी श्री. बेतकीकर यांनी दिली.