नॉर्थईस्टवरील विजयासह एटीकेची गुणतक्त्यात प्रगती

0
109

झीक्यूईन्हाने उत्तरार्धात  नोंदविलेल्या एकमेव गोलामुळे गतविजेत्या एटीकेने हीरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा १-० असा निसटता पराभव करीत गुणतक्त्‌यात प्रगती केली. एटीकेने आठवरून सहावा क्रमांक गाठला.

इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर बुहतांश नीरस झालेल्या लढतीत झीक्यूईन्हाने उत्तरार्धात केलेला हा गोल निर्णायक ठरला. एटीकेने नऊ सामन्यांत तिसरा विजय मिळविला. तीन बरोबरी व तीन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे १२ गुण झाले. त्यांनी जमशेदपूर एफसी (१०) व केरळा ब्लास्टर्स (११) यांना मागे टाकले. नॉर्थईस्टला नऊ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. सात गुणांसह त्यांचे शेवटून दुसरे म्हणजे नववे स्थान कायम राहिले.

७३व्या मिनिटाला प्रबीर दासने चेंडूवर ताबा मिळवित मध्य क्षेत्राच्या थोडे पुढून आगेकूच केली. त्याने रॉबिन सिंगला पास दिला. रॉबिनने मारलेला चेंडू नॉर्थईस्टचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याने अडविला. नॉर्थईस्टच्या सांबिनाने बचावासाठी हेडींग केले, पण चेंडू थेट त्याच्या समोरच असलेल्या झीक्यूइन्हाच्या पायापाशी पडला. झीक्यूइन्हाने नेटच्या उजव्या कोपर्‍यात चेंडू मारत एटीकेच्या विजयावर शिक्कामोत बर् करणारा एकेमव गोल नोंदविला.