निश्चित उत्पन्नाचे पर्याय

0
7
  • शशांक मो. गुळगुळे

कंपन्यांच्या मुदत ठेवींत गुंतवणूक करताना फक्त व्याजदर न पाहता संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, पत, मानांकन (रेटिंग), व्यवसायाची स्थिती, आव्हाने, ठेव व व्याज वेळेवर देण्याचा इतिहास, प्रवर्तक आदींची पूर्ण माहिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.

निश्चित उत्पन्नाच्या विविध पर्यायांमध्ये प्रामुख्याने बँकांमधील ठेवी, पोस्टातील ठेव योजना, खाजगी कंपन्यांच्या ठेव योजना, एनसीडी (नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स- अपरिवर्तनीय कर्जरोखे), रिझर्व्ह बँकेचे बॉण्ड, काही डेट योजना आदींचा समावेश होतो. गुंतवणूक करताना किती काळासाठी गुंतवणूक करायची, जोखीम क्षमता, गरज पडल्यास पैसे परत मिळण्याबाबतचे नियम इत्यादी मुद्दे लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा. काही रक्कमही चांगल्या बँकांच्या ‘एफडी’मध्ये (फिक्स डिपॉझिट- मुदतठेवी) नक्कीच ठेवावी. सार्वजनिक उद्योगातील स्टेट बँकेसह अन्य बँका, खाजगी बँकांत- आयसीआयसीआय व एचडीएफसी, सहकारी बँकांत- सारस्वत, टीजेएसबी, एसव्हीसी व एनकेजीएसबी यांपैकी कोणत्याही एका किंवा जास्त बँकांत गुंतवणूक करण्यास हरकत नाही. बँका आता 7 ते 8 टक्क्यांदरम्यान कमाल व्याज देऊ लागल्या आहेत.
अल्प बचत योजना

केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांचे व्याजदरही सध्या चांगले आहेत. सध्याचे व्याजदर 30 जूनपर्यंत असून 1 जुलै 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी नवे व्याजदर जाहीर होणार. केंद्र सरकारतर्फे या योजनांचे व्याजदर दर तीन महिन्यांनी जाहीर होतात. अल्पबचत योजनांतील गुंतवणूक सुरक्षित असते. जोखीम नसते व परतावा निश्चित मिळतो.

अल्पबचत योजनांचे व्याजदर

योजनेचे नाव 01-04-2023 ते 01-01-2023 ते
30-06-2023 या 31-03-2023 या
कालावधीसाठीचे कालावधीत

व्यजदर असलेले व्याजदर

  1. पोस्ट ऑफिस बचत खाते 4 4
  2. एक वर्षाची मुदत ठेव 6.8 6.6
  3. दोन वर्षांची मुदत ठेव 6.9 6.8
  4. तीन वर्षांची मुदत ठेव 7.0 6.9
  5. पाच वर्षांची मुदत ठेव 7.5 7.0
  6. पाच वर्षांची आवर्ती ठेव योजना 6.2 5.8
  7. ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2 8.0
  8. मासिक उत्पन्न योजना 7.4 7.1
  9. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 7.7 7.0
  10. किसान विकासपत्र 7.5 7.2
    (115 महिन्यांत दुप्पट) (120 महिन्यांत दुप्पट)
  11. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी 7.1 7.1
  12. सुकन्या समृद्धी योजना 8.0 7.6
    13) महिला सन्मान बचतपत्र योजना 7.50

(ही योजना यंदाच्या आर्थिक वर्षापासून कार्यरत झाली)

या सर्व सरकारी योजनांचे व्याजदर सध्या आकर्षक आहेत. खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेले पोस्टाचे जाळे आणि सरकारने नमलेले अधिकृत अल्पबचत एजंट यांच्यामुळे या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत.
कंपन्यांच्या मुदतठेवी
बँकांप्रमाणेच काही बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी- नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज्‌‍) भारतीय रिझर्व्ह बँकेने ठेवी स्वीकारण्याची परवानगी दिलेली आहे. यात एचडीएफसी कंपनी अग्रणी आहे. याशिवाय बजाज फायनान्स, महिन्द्रा फायनान्स, आयसीआयसीआय होम फायनान्स, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, श्रीराम फायनान्स या कंपन्याही ठेवी स्वीकारतात. या कंपन्या ठेवीदारांना बँकेपेक्षा अधिक दराने व्याज देतात. पण बँकांत ठेवी ठेवण्यात कमी असलेली जोखीम या गुंतवणुकीत मात्र जास्त असते. कंपन्यांच्या मुदत ठेवींत गुंतवणूक करताना फक्त व्याजदर न पाहता संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, पत, मानांकन (रेटिंग), व्यवसायाची स्थिती, आव्हाने, ठेव व व्याज वेळेवर देण्याचा इतिहास, प्रवर्तक आदींची पूर्ण माहिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. या गुंतवणुकीवर बँकांच्या ठेवींसारखे विमा संरक्षण नाही.

कंपन्यांच्या मुदत ठेवींवर 1 मे 2023 रोजी असलेले व्याजदर-

कंपनीचे नाव रेटिंग कालावधी व्याजदर (टक्के)

  1. एचडीएफसी लिमिटेड एएए 45 महिने 7.70
  2. एचडीएफसी लिमिटेड एएए 75 महिने 8.00
    (ज्येष्ठ नागरिकांसाठी) 45 महिने 7.95
  3. बजाज फायनान्स एएए 44 महिने 7.95
    (ज्येष्ठ नागरिकांसाठी) 8.20
  4. महिंद्रा फायनान्स एएए 48 व 60 महिने 7.75
    (ज्येष्ठ नागरिकांसाठी) 8.00
  5. एलआयसी हाऊसिंग फाय. एएए 36 व 60 महिने 7.75
    (ज्येष्ठ नागरिकांसाठी) 8.00
  6. आयसीआयसीआय होम फाय. एएए 65 महिने 7.70
    (ज्येष्ठ नागरिकांसाठी) 7.95
  7. पीएनबी हाऊसिंग फाय. एए+ 36 महिने 7.70
    (ज्येष्ठ नागरिकांसाठी) 7.95
  8. श्रीराम फायनान्स एए+ 50 व 60 महिने 8.50
    (ज्येष्ठ नागरिकांसाठी) 9.00

एनसीडी
काही कंपन्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरच्या (एनसीडी) माध्यमातून पैसे उभे करतात. भांडवली बाजारात जसे शेअर विक्रीस काढले जातात तसेच ‘एनसीडी’ही विक्रीस काढले जातात. अलीकडच्या काळात विक्रीस आलेल्या चोला मंडलम्‌‍ इन्व्हेस्टमेंट्स ॲण्ड फायनान्स, एडलविन, इंडियाबुल्स, मुथूट फायनान्स या एनसीडी इश्यूंचे व्याजदर 8 ते 9 टक्क्यांच्या दरम्यान असतात. ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते तरी यात जोखीम असतेच.
यात गुंतवणूक करताना संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, रेटिंग, व्यवसायाची स्थिती, आव्हाने, प्रवर्तक आदींची पूर्ण माहिती लक्षात घेतलीच पाहिजे. डीएचएफएल व डिएसके डेव्हलपर्स या कंपन्यांच्या एनसीडीमध्ये गुंतवणूक करणारे अडचणीत आले होते.
रिझर्व्ह बँक फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड
केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेमार्फत 2020 मध्ये फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉण्ड बाजारात आणले. सात वर्षे मुदतीचे हे सरकारी बॉण्ड अत्यंत सुरक्षित मानले जातात. यातील गुंतवणुकीवर दर सहा महिन्यांनी (1 जानेवारी व 1 जुलै) व्याज दिले जाते. मात्र ते तरत्या किंवा बदलत्या स्वरूपाचे असते. सध्या 30 जून 2023 पर्यंत याचा व्याजदर 7.35 टक्के आहे.
निश्चित उत्पन्नाच्या योजनांचा पर्याय निवडताना भराव्या लागणाऱ्या प्राप्तिकराचाही विचार व्हायला हवा. ‘पीपीएफ’मधली गुंतवणूक वगळता बाकी सर्व गुंतवणूक योजनांवर मिळणारे व्याज व परतावा करपात्र असतो. गुंतवणुकीतून येणारे उत्पन्न करदात्याच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट होते व एकूण उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो.
आरबीआय रिटेल
सर्वसामान्य गुंतवणूकदारांस आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेत खाते उघडता येते. हे खाते ऑनलाईन पोर्टलवर उघडता येते (हीींंीि://ीलळीशींरळश्रवळीशलीं.ेीस.ळप). केवायसी कागदपत्रे, ई-मेल आयडी, आधारकार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर या गोष्टी खाते उघडताना लागतात. हे खाते निवासी तसेच अनिवासी भारतीय असे दोघांनाही उघडता येते. हे खाते एकट्याच्या किंवा संयुक्त नावाने उघडता येते. ऑनलाईन पोर्टलवर लॉग-इन करून खाते उघडण्यासाठीचा अर्ज भरावा लागतो. त्यानंतर आपल्या मोबाईलवर, तसेच आपल्या ई-मेलवर ‘ओटीपी’ पाठविला जातो. हे दोन्ही ‘ओटीपी’ सबमिट केल्यावर आपले खाते उघडले जाते. या खात्यास आपले बँक खाते जोडावे लागते. ते चेकची फोटोकॉपी अपलोड करून किंवा खात्याचे सर्व तपशील भरून लिंक करावे लागते. खात्याला ‘नॉमिनेशन’ देणे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त दोन नॉमिनी देता येतात. आरबीआय ट्रिटेल डायरेक्ट ही सुविधा वापरण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. गरज पडल्यास खात्यामधील सिक्युरिटिज प्लेज (झश्रशवसश) करून कर्ज घेता येते व असे बँकांकडून सहज मिळते. आपण अगदी सहजगत्या घरबसल्या ‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’ खाते उघडू शकतो व आपल्या दीर्घकालीन गरजांसाठी सुरक्षित व किफायतशीर गुंतवणूक करू शकतो.