Home बातम्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरपोलिसांच्या बदल्या

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरपोलिसांच्या बदल्या

0

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून पोलीस खात्याने १९२ पोलीस अधिकारी व ४९८ हवालदारांच्या बदल्यांचा आदेश काल काढला. या सर्व पोलिसांना तात्काळ नव्या पोलीस स्थानकांवर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर गोव्यातील कित्येक पोलीस अधिकार्‍यांच्या दक्षिण गोव्यात व दक्षिण गोव्यातील कित्येक पोलीस अधिकार्‍यांच्या उत्तर गोव्यात बदल्या करण्यात आल्याने ते नाराजी व चिंता व्यक्त करताना दिसत होते. मूळ पेडणे, डिचोली व बार्देश तालुक्यातील रहिवाशी असलेल्या कित्येकांना दक्षिण गोव्यातील सांगे, काणकोण, सासष्टी आदी तालुक्यांत तर दक्षिणेकडील टोकावरील कित्येकांना उत्तरेकडील तालुक्यात हलवण्यात आल्याने त्यांना आपल्या कुटुंबियांचे आता कसे होईल याची चिंता वाटू लागली आहे.

दरम्यान, एखाद्या पोलीस अधिकार्‍याची त्याच्या घरापासून २० कि. मी. पेक्षा जास्त अंतरावर बदली केल्यास त्याला मासिक २० हजार रु. एवढा प्रवास भत्ता द्यावा लागतो, असे एका अधिकार्‍याने सांगितले. मात्र, सरकार एवढा भत्ता देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी १९ निरीक्षक व तीन अधीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या.